शामक दावर यांच्या 'उल्लू का पठ्ठा'ला सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मान !

रंगबेरंगी दिव्यांचा झगमगाट , रोषणाई , नृत्य व संगीताचा अनोखा मेळ आणि फिल्मी तारे ह्या सर्वांचं एक अनोखं मेळ म्हणजे अवॉर्ड सोहळा !

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 7, 2017, 08:31 PM IST
शामक दावर यांच्या 'उल्लू का पठ्ठा'ला सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मान !

मुंबई : रंगबेरंगी दिव्यांचा झगमगाट , रोषणाई , नृत्य व संगीताचा अनोखा मेळ आणि फिल्मी तारे ह्या सर्वांचं एक अनोखं मेळ म्हणजे अवॉर्ड सोहळा ! अवॉर्ड सोहळ्यांमध्ये सिने ताऱ्यांना पुरस्काराच्या रूपाने आपल्या कामाची पावती मिळते आणि म्हणूनच सिनेअभिनेते वर्षभर ह्या पुरस्काराची वाट बघत असतात. 

गाण्यासाठी सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मान

यंदा पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्ड्स २०१७ च्या ह्या दिमाखदार सोहळ्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावर ह्यांनी सिनेमा जग्गा जासूस मधील "उल्लू का पठ्ठा " ह्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मान पटकावला आहे .   

शामक दावर ह्यांचाही आनंद गगनात मावेनासा

वेगवेगळ्या विभागात सर्वाना आपल्या कामाची पोचपावती मिळाली असता नृत्यदिग्दर्शक शामक दावर ह्यांचाही आनंद गगनात मावेनासा झालेला आहे . ह्या पुरस्काराबद्दल ते म्हणतात की , "स्टारस्क्रीन अवॉर्ड्सच्या यशाबद्दल मी खुप खुश आहे . 

नृत्यदिग्दर्शन करणे ही एक अद्भुतपूर्व गोष्ट

जग्गा जासूस सिनेमाचे नृत्यदिग्दर्शन करणे ही एक अद्भुतपूर्व गोष्ट होती , माझी नृत्यशैली ही अन्य नृत्यापेक्षा खूप वेगळी आणि तितकीच मजेशीर आहे आणि मी मनापासून आभार मानतो दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि आमचे सिनेमॅटोग्राफर रवी सर ह्यांच्या कमालीच्या कल्पनेशैलीमुळे ह्या गाण्याला 'चार चाँद ' लागले .

उल्लू का पठ्ठा हे गाणं प्रवासादरम्यानचं

रणबीर आणि कतरीना ह्या दोघांना मी खूप जवळचे मानतो आणि ह्याच गोष्टीमुळे आमच्या तिघांमध्ये ताळमेळ बसला व त्या दोघांनीही माझ्या मूव्हमेंट्स त्यांनी पटकन शिकल्या आणि ह्या गाण्याला जिवंत केलं. 

उल्लू का पठ्ठा हे गाणं प्रवासादरम्यानचं आहे , आणि ह्या गाण्याचे दिग्दर्शन म्हणजे माझ्यासाठी जणू एक मेजवानीच होती त्याप्रमाणेच मी आपले ज्युरी आणि प्रेक्षकवर्गाचे आभार मानेन ज्यांनी 'उल्लू का पठ्ठा ' ह्या गाण्यावर मनापासून प्रेम दिलं . " 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close