शत्रुघ्न सिन्हा आणि त्रिशालाच्या भेटीत गप्पा मात्र 'या' व्यक्तीबद्दल ...

खासदार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची नुकतीच त्रिशाला दत्त सोबत भेट झाली. 

Updated: Jan 6, 2018, 03:15 PM IST
शत्रुघ्न सिन्हा आणि त्रिशालाच्या भेटीत गप्पा मात्र 'या' व्यक्तीबद्दल ...   title=

मुंबई : खासदार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची नुकतीच त्रिशाला दत्त सोबत भेट झाली. 

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी त्रिशाला अनेक वर्ष भारताबाहेर राहते. 

कोण आहे त्रिशाला ? 

संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा यांची मुलगी म्हणजे त्रिशाला. १९८७ साली  ऋचा आणि संजय दत्त यांचे लग्न झाले. मात्र ब्रेन ट्युमरच्या आजारामुळे १९९६ साली ऋचाचे निधन झाले. 

दुबईत भेट

बॉलिवूडपासून दूर असलेल्या त्रिशालाची आणि शत्रुघ्न सिन्हा यांची नुकतीच दुबईत भेट झाली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र यावेळेस त्रिशाला ही शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाची फॅन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

ट्विटर शेअर केला प्रसंग 

 

 

शत्रुघ्न सिन्हा हे सुनील दत्त यांचे मित्र होते. ट्विटर लिहताना त्यांना सुनील दत्त यांच्या आठवणीला उजाळा देत खास मेसेज शेअर केला आहे.