शिल्पाच्या बॉलिवूड करिअरला २४ वर्ष पूर्ण...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉलिवूडमध्ये २४ वर्ष पूर्ण झाली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 06:39 PM IST
शिल्पाच्या बॉलिवूड करिअरला २४ वर्ष पूर्ण...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉलिवूडमध्ये २४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने शिल्पाने खास ट्विट केले. त्यात शिल्पा म्हणते, "वा ! विश्वास नाही होत की 'बाजीगर'ला आणि माझ्या करियरला २४ वर्ष पूर्ण झाली. चांगली गोष्ट ही आहे की, मला अजूनही २४ वर्षांचे असल्यासारखेच वाटते."

शिल्पाने आपल्या करिअरची सुरुवात सुपरस्टार शाहरुख खान सोबत १९९३ मध्ये 'बाजीगर' या चित्रपटातून केली. 

शिल्पाचे पती आणि बिजनेसमन राज कुंद्राने देखील ट्विट करून शिल्पाला शुभेच्छा दिल्या. राजने ट्विटमध्ये लिहिले की, "बॉलिवूडमध्ये २४ वर्ष पूर्ण केल्याबद्दल शिल्पा शेट्टीला शुभेच्छा. तू काय एक वर्षाची असताना करियरची सुरुवात केली होती? अजून देखील खूप छान दिसतेस."

करिअरच्या सुरुवातीला ती मॉडेलिंग करत होती. १६ वर्षाची असताना तिने पहिल्यांदा लिम्का ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग केले होते. एंथनी गर्ल्‍स स्‍कूल हाईस्‍कूल मधून शालेय तर पोदार कॉलेजमधून तिने पुढचे शिक्षण घेतले आहे. फक्त अभ्यासात नाही तर नृत्य आणि खेळात देखील ती तरबेज आहे. ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्‍यांगना आहे. त्याचबरोबर शाळेच्या दिवसात ती व्हॉलीबॉल टीमची कॅप्टन देखील होती. 

करिअरच्या सुरुवातीला सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलेल्या शिल्पाने आपल्या कामाने हळूहळू आपली वेगळी ओळख निर्माण केली.