झी टॉकीज सोबत रविवार होणार आणखी खास 'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे

कधी रंगणार हा कार्यक्रम

झी टॉकीज सोबत रविवार होणार आणखी खास 'शिट्टी वाजली' या कार्यक्रमाद्वारे

मुंबई : मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळत आला आहे.

येत्या रविवारी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी शिट्टी वाजली हा खास कार्यक्रम प्रसारित करणार आहे. अगदी नावाप्रमाणेच हा कार्यक्रम फुल टू धमाल असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांचे बहारदार नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. अंकिता लोखंडे हिचा कॅब्रे डान्स या कार्यक्रमात चार चांद लावणार आहे, तसेच दीपाली सय्यद हिचा मुजरा देखील तितकाच मनमोहक असणार आहे. सैराट फेम रिंकू राजगुरू देखील या कार्यक्रमात सहभागी झाली असून संगीत सम्राट पर्व 2 चे कॅप्टन अभिजित कोसंबी या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.

अभिनेत्री ऋतुजा शिंदे ही मराठी गाण्यांवर एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. मयुरेश पेम, तेजा देवकर आणि ऐश्वर्या बदडे हे तिघे आदर्श शिंदेच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरणार आहेत तसेच अभिनेत्री मीरा जोशी ही हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून सगळ्यांवर भुरळ पडणार आहे. तेव्हा तुमचा रविवार अधिक खास  बनवण्यासाठी पाहायला विसरू नका शिट्टी वाजली रविवार 2 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता फक्त झी टॉकीजवर

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close