काय, ऋषी कपूरना थर्ड स्टेजचा कॅन्सर?

अद्याप अधिकृत माहिती नाही

काय, ऋषी कपूरना थर्ड स्टेजचा कॅन्सर? title=

मुंबई : बॉलिवूड जगतात एका पाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान खानला ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये उपचार घेत आहे. तर सोनाली बेंद्रेला हायस्टेज मेटास्टेटिक कॅन्सर झाला असून ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आता तीन दिवस अगोदरच ऋषी कपूर आपल्या आजाराचा खुलासा करण्यासाठी अमेरिकेत गेले असता इथे त्यांच्या आईचं कृष्णा राज कपूर यांच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आणि त्यावेळी ऋषी कपूर, नीतू कपूर आणि रणबीर कपूर अनुपस्थित होते. 

आतापर्यंत अभिनेता ऋषी कपूर यांना कोणता आजार झालाय याची माहिती नव्हती. पण आता या आजारावर खुलासा झाला आहे. आणि तो अतिशय धक्कादायक आहे. 1 ऑक्टोबर रोजी आईच्या जाण्याचं दुःख सहन करणारे ऋषी कपूर थर्ड स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत असल्याचं कळत आहे. 

bollywoodbubble.com ने दिलेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तींना त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेत किमोथेरपीद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तसेच ऋषी कपूर यांना बॅक पेनचा देखील त्रास असल्यामुळे हा उपचार अतिशय काळजी घेऊन केला जाणार आहे. 

काय म्हणाले भाऊ रणधीर कपूर? 

तसेच जुही चावला यांच्यासोबत येणारा ऋषी कपूर यांच्या सिनेमाचं शुटिंग देखील थांबवण्यात आलं आहे. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची अधिकृत माहिती अजून त्यांच्या कुटुंबियांकडून मिळालेली नाही. रणधीर कपूर या चर्चेवर खूप रागावले असून आम्हाला अजून ऋषी कपूर का अमेरिकेत गेला याची माहिती नाही. तर लोकं अशी अफवा कशी पसरवू शकतात? यावर ते रागावले आहेत. आतापर्यंत घरातील कोणत्याच व्यक्तीला त्यांच्या आजारपणाची माहिती मिळालेली नाही. 

ऋषी कपूर यांनी 29 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये अशी माहिती दिली की, ते उपचारा करता छोटीशी सुट्टी घेत आहेत. तसेच त्यांनी हे देखील म्हटलं होतं की, कोणतीही अफवा याबाबत पसरवू नका. मला सिनेसृष्टीत 45 वर्षांहून अधिक काळ झाला. मला तुमच्या प्रेमाची आणि शुभेच्छांची आवश्यकता आहे. मी लवकरच परत येणार आहे.