इम्रान हाश्मी आणि ईशाचं ‘सोचा हैं’ जबरदस्त रेट्रो स्टाईल गाणं

‘बादशाहो’ या सिनेमातील आणखी एक झकास गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘सोचा है’ असे या गाण्याचे बोल असून हे जूनंच गाणं नवा स्टाईलने तयार करण्यात आलं आहे.

Updated: Aug 17, 2017, 03:30 PM IST
इम्रान हाश्मी आणि ईशाचं ‘सोचा हैं’ जबरदस्त रेट्रो स्टाईल गाणं title=

मुंबई : ‘बादशाहो’ या सिनेमातील आणखी एक झकास गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘सोचा है’ असे या गाण्याचे बोल असून हे जूनंच गाणं नवा स्टाईलने तयार करण्यात आलं आहे.

इम्रान हाश्मी आणि ईशा गुप्ता यांच्या हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

मिलन लुथरिया दिग्दर्शत त्या सिनेमात आणीबाणीच्या काळातील एक कथा दाखवण्यात येणार असल्याने या सिनेमातही एक रेट्रो स्टाईलचं गाणं दाखवण्यात आलं आहे. या गाण्यात इम्रान हाश्मी आणि ईशा एका बाईकवरच हे गाताना दिसत आहेत. जुबिन नौतियाल आणि निती मोहन यांनी हे गाणं गायलं आहे. तर म्युझिक रिक्रएट केलंय तनिष्क बागची याने. हे ओरिजनल गाणं संगीतकार आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलं असून किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. 

याआधी इम्रान हाश्मी आणि सनी लिओनीचं गाणं चांगलंच गाजलं आहे. एकंदर ट्रेलर आणि गाण्यांमुळे या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.