पहिल्यांदा सोनालीच्या मुलाने साजरा केला गणेशोत्सव

भावूक पोस्ट 

पहिल्यांदा सोनालीच्या मुलाने साजरा केला गणेशोत्सव

मुंबई : सोनाली बेंद्रे कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनाली कायम तिथून आपल्या उपचाराबाबत माहिती देत असते. अनेकदा ती इमोशनल पोस्ट शेअर करते आणि ती कायम कुटुंबियांनी आणि मित्र परिवारांना मिस करत असल्याचे अपडेट करत असते. अशात जेव्हा गणेशोत्सवाची सगळीकडे धूम असताना सोनाली आपल्या कुटुंबापासून दूर आहे. 

गणेश चतुर्थीचा हा सण बॉलिवूडमध्ये खास असतो. प्रत्येक कलाकार आपल्या घरी 64 कलांचा अधिपती गणरायाला घेऊन येतात. आणि त्याची मनोभावे पूजा करतात. सोनाली बेंद्रेने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गणेश चतुर्थीचे 3 फोटो शेअर केले आहेत. सोनालीचा नवला गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहल या फोटोंमध्ये दिसत आहे. सोनालीने हे फोटो शेअर करताना लिहीलं आहे की, गणेश चतुर्था हा सण आमच्यासाठी खूप खसा आहे. मी घरी होणाऱ्या सेलिब्रेशनला मिस करत आहे. मी आता खूष आहे. आणि गणरायाचा असाच आशिर्वाद आमच्यावर राहू दे. 

सोनाली उपचारा दरम्यान मोकळा वेळ मिळाली की, फिरण्यात घालवते. आताच सोनालीने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती A Gentleman in Moscow हे पुस्तक वाचत होती. असं वाटतं की, तिला या पुस्तकाशी प्रेम आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close