सोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेत्री जया बच्चन नुकत्याच एका रिसेप्शनला गेल्या होत्या. 

Updated: Apr 23, 2018, 11:52 AM IST
सोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेत्री जया बच्चन नुकत्याच एका रिसेप्शनला गेल्या होत्या. या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. यादरम्यान सोनम कपूर मस्तीच्या मूडमध्ये होती तिने यावेळी जबरदस्त डान्सही केला. सोनमसोबत जया बच्चन यांनीही डान्स केला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पार्टीत सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तर जया बच्चनने पिवळ्या रंगाची साडी घातलीये.

फॅशन डिझायनर संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टूचे वेडिंग रिसेप्शन होते. या पार्टीत अनेक बॉलीवूडचे कलाकारही होते. सोनमचा रिसेप्शमधील व्हिडीओ व्हायरल होतोय. यात सोनम संदीप खोसलासह प्रेम रतन धन पायो या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

 

Watch @sonamkapoor match steps with @abujani1 . Psst: he is AWESOME #saudaminikishaadi @saudamini08 @abujanisandeepkhosla

A post shared by Namrata Zakaria (@namratazakaria) on

या पार्टीत सोनमव्यतिरिक्त श्वेता नंदा, सारा अली खान आणि करण जोहर यांनीही खूप मस्ती केली. 

सोनम गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या गोष्टीवरुन चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार सोनम आपला बॉयफ्रेंड आनंद अहुजाशी लग्न करणार आहे.