'सूर्यवंशम'ला १९ वर्ष पूर्ण, म्हणून मॅक्सवर सारखा लागतो चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ वर्ष झाली आहेत. २१ मे १९९९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Updated: May 21, 2018, 08:16 PM IST
'सूर्यवंशम'ला १९ वर्ष पूर्ण, म्हणून मॅक्सवर सारखा लागतो चित्रपट title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ वर्ष झाली आहेत. २१ मे १९९९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९ वर्षानंतरही या चित्रपटाला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात येतं. यातलं प्रमुख कारण म्हणजे सेट मॅक्सवर वारंवार हा चित्रपट दाखवला जातो. सिनेमातील अनेक पात्रे म्हणजेच हीरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत यांची नावे तसेच सिनेमातील डायलॉग लोकांना अक्षरश: पाठ झालेत. सोशल मीडियावर तर हा सिनेमा पुन्हा पुन्हा दाखवण्यावरुन जोक्सही झालेत.

म्हणून सारखा दाखवतात सूर्यवंशम

सूर्यवंशम प्रदर्शित झाला त्याच काळामध्ये मॅक्स हे चॅनल लॉन्च झालं होतं. त्यामुळे चॅनलनं सूर्यवंशम या चित्रपटाचे अधिकार १०० वर्षांसाठी विकत घेतले होते. म्हणून सूर्यवंशम हा चित्रपट मॅक्सवर वारंवार दाखवला जातो. त्यामुळे आता आणखी ८१ वर्ष तरी सूर्यवंशम मॅक्सवर दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.