दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 12:32 PM IST
दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी title=

मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

तिचे हे अचानक जाणे तिच्या चाहत्यांसह अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का देणारे असेच होते. कोणी कल्पनाही केली नसेल की असे काही घडेल. 

सोमवारी आलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. दुबईत कौटुंबिक सोहळ्यात श्रीदेवीने उत्साहाने भाग घेतला होता. मात्र दुबईत जाण्याआधी तिची तब्येत बरी नसल्याची माहिती तिच्या जवळच्या मैत्रिणीकडून मिळतेय.

श्रीदेवीने दुबईला जाण्याआधी तिने तिच्या मैत्रिणीशी बातचीत केली होती. मिड-डेच्या बातमीनुसार पिंकी रेड्डी ज्या श्रीदेवीच्या बालपणीच्या मैत्रीण आहेत त्यांनी ही माहिती दिलीये.

दुबईमध्ये भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला जाण्याआधी श्रीदेवीचे पिंकी रेड्डींशी बोलणे झाले होते. यावेळी श्रीदेवीने आपल्याला तिच्या आजाराविषयी सांगितल्याचे पिंकींनी सांगितले. पिंकी म्हणाल्या, दुबईला जाण्याआधी माझे श्रीदेवीशी बोलणे झाले होते. तिला ताप होता आणि ती अँटी बायोटिक्स घेत होती. तिला खूप थकल्यासारखे वाटत होते. मात्र आपल्याला लग्नाला जावेच लागेल असे ती म्हणाली. 

पिंकी रेड्डींनी श्रीदेवीच्या मृत्यूबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांवर नाराजी व्यक्त केलीये. श्रीदेवीच्या मृत्यूची खिल्ली उडवली जात असल्याने वाईट वाटतेय असे त्या म्हणाल्या.

श्रीदेवींवर आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.