सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

पाहा अफलातून ट्रेलर 

सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर   title=

मुंबई : छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर आता सुबोध भावे नवा कोरा विषय घेऊन सिनेमाच्या रुपात दिसणार आहे. सुबोध भावेसोबत अभिनेत्री श्रुती मराठे स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या सिनेमातील एक गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. 

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमातील या गाण्याला मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलं असून याचं संगीत-दिग्दर्शन चिनार महेश यांनी केले आहे. तर जसराज जोशी आणि किर्ती किल्लेदार यांचा सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे. 'शुभ लग्न सावधान' या सिनेमात श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांच्या मुख्य भूमिका आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 'बंध नायलॉन' चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे.पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.