जे बंगलुरूत करू शकले नाही ते दिल्लीत करायला सनी लिओनी सज्ज

सनी लिऑनचा कर्नाटकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरून अनेक वाद सुरू झाला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 10, 2018, 04:38 PM IST
जे बंगलुरूत करू शकले नाही ते दिल्लीत करायला सनी लिओनी सज्ज  title=

मुंबई : सनी लिऑनचा कर्नाटकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरून अनेक वाद सुरू झाला. 

आणि यानंतर बंगलुरूमध्ये देखील सनी आपला कार्यक्रम करू शकली नाही. लेकिन जे काम बंगलुरूमध्ये सनी करू शकली नाही ते काम आता ती दिल्लीत करणार आहे. सनीच्या चाहत्यांसाठी ही खुशखबरी आहे. लोहरीचे औचित्य साधून 13 जानेवारीला सनी दिल्लीत असणार आहे. मात्र इथे सनी एकटी येणार नाही. तिच्यासोबत सनी लिओनीचं प्रसिद्ध गाणे 'बेबी डॉल मैं सोने दी' ची गायिका कनिका कपूर देखील येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनी लिओनी, गायिका कनिका कपूर आणि रोशनी चोपडा देखील दिसणार आहे. हा शो दिल्लीच्या इंदिरा गांधी इंदोर स्टेडिअममध्ये होणार आहे. गेल्यावर्षी सनी लिओनी तेरा इंतजार या सिनेमांत अरबाज खान सोबत दिसली आहे. 

गेल्यावर्षी अनेक सिनेमांत ती आयटम साँगमध्ये देखील दिसली. शाहरूख खानचा सिनेमा रूईसमध्ये तिचं लैला में लैला हे गाणं हिट ठरलं.