... म्हणून सुशांत सिंह राजपूतला मिळाला ''नासा"मध्ये प्रवेश

साईड डान्सर ते एम एस धोनी या सिनेमापर्यंतचा सुशांत सिंह राजपूजतचा हा प्रवास साऱ्यांनाच थक्क करणारा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देता यावा म्हणून अभिनेता सुशांत कायमच जास्तिचे परिश्रम घेताना दिसतो.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 15, 2017, 08:33 PM IST
... म्हणून सुशांत सिंह राजपूतला मिळाला ''नासा"मध्ये प्रवेश  title=

मुंबई: साईड डान्सर ते एम एस धोनी या सिनेमापर्यंतचा सुशांत सिंह राजपूजतचा हा प्रवास साऱ्यांनाच थक्क करणारा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देता यावा म्हणून अभिनेता सुशांत कायमच जास्तिचे परिश्रम घेताना दिसतो.

हल्लीच सुशांत सिंह राजपूतने आपल्या आगामी 'चंदा मामा दूर के' सिनेमासाठी चक्क नासाला जाऊन ट्रेनिंग घेतलं आहे. आणि महत्वाची, कौतुकाची बाब म्हणजे सुशांत सिंह हे ट्रेनिंग घेणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे.  तो आता युएसएसआरमधून सुद्धा प्रशिक्षण घेतो आहे. आपल्या भूमिकेसाठी सुशांत सिंग राजपूत वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतो आहे. सुशांत सिंग राजपूत आपल्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी जबरदस्त मेहनत घेताना दिसतोय. युएसएसआरसीकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. ''यात सुशांतचे आणि दिग्दर्शकचे अभिनंदन केले आहे. सुशांतने घेतलेले प्रशिक्षण अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी असेल. आमच्याकडून या चित्रपटासाठी शुभेच्छा.'' 

निर्माता विकी राजानीचे म्हणणे आहे की ,''आमच्यासाठी ही एक सन्मानाची गोष्ट आहे की आम्ही बॉलिवूडमध्ये एक अशा प्रकारचा चित्रपट तयार करतो आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून दिग्दर्शक संजय पुरन सिंग या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत. सुशांत सिंग याची ट्रेनिंग घेण्यासाठी नासाला जाऊन आला. आम्हाला आशा आहे की आमचा हा प्रयत्न यशस्वी होईल.''

याचित्रपटात सुशांत सिंग एका अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन हे ही याचित्रपटात झळकणार आहे. याचित्रपटातील अभिनेत्रीचा रोल अतिशय लहान आहे त्यामुळे अजून कोणतिही अभिनेत्रीचे नाव या रोलसाठी फायनल झालेले नाही. फातिमा सना शेख हिला चित्रपटाची ऑफर दिली गेली. निधी अग्रवाल हिलाही विचारणा आले होते.  पण त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुठलीही हिरोईन या रोलसाठी उत्सूक नाही असेच एकंदरीत दिसते आहे.