सुश्मिता सेन पडली प्रेमात, कोण आहे ‘तो’ राजकुमार?

बॉलिवूडच्या अनेक अविवाहीत अभिनेत्री विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यात सुश्मिता सेन हिचाही समावेश आहे. सुश्मिताने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. या पोस्टमधून सुश्मिता कुणाच्यातरी प्रेमात पडल्याचे समजते. सुश्मिता नेमकी कुणाच्या प्रेमात पडली? कोण आहे तिचा राजकुमार? हे प्रश्न आता तिच्या चाहत्यांना सतावत आहेत. 

Updated: Sep 13, 2017, 06:56 PM IST
सुश्मिता सेन पडली प्रेमात, कोण आहे ‘तो’ राजकुमार?

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अविवाहीत अभिनेत्री विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यात सुश्मिता सेन हिचाही समावेश आहे. सुश्मिताने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. या पोस्टमधून सुश्मिता कुणाच्यातरी प्रेमात पडल्याचे समजते. सुश्मिता नेमकी कुणाच्या प्रेमात पडली? कोण आहे तिचा राजकुमार? हे प्रश्न आता तिच्या चाहत्यांना सतावत आहेत. 

अभिनेत्री सुश्मिता सेनने शेअर केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा ‘तो’ मनापासून काही गोष्टी तुम्हाला सांगतो तेव्हा त्या खरंच अर्थपूर्ण असतात......’. आता या पोस्टमध्ये सुश्मिताने ‘तो’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुश्मिताचा तो कोण असेल? हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

सुश्मिता सेन ही सिंगल मदर असून तिला दोन मुली आहेत. रिनी आणि अलिशा असे तिच्या दोन मुलींची नावे आहेत. नुकताच तिच्या एका मुलीचा वाढदिवसही झाला.