सुव्रत आणि मृण्मयी लग्नाच्या बेडीत?

दिल दोस्ती दुनियादारी आणि दोबारा फेम सुव्रत जोशी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

Updated: Jun 24, 2017, 04:29 PM IST
सुव्रत आणि मृण्मयी लग्नाच्या बेडीत? title=

मुंबई : दिल दोस्ती दुनियादारी आणि दोबारा फेम सुव्रत जोशी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

या फोटोत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकल्याचे दिसतायत. हा फोटो पाहून त्यांचे चाहते नक्कीच विचारात पडले असतील. मात्र आपल्या आगामी शिकारी या सिनेमासाठीचा हा फोटो आहे. 

सुव्रत जोशीने आपल्या फेसबुकवरुन हा फोटो शेअर केलाय. शिकारी या आगामी सिनेमात सुव्रत आणि मृण्मयीची जोडी पाहायला मिळणार आहे.