तापसी पन्नू घेऊन येतेय 'ट्रोल पुलिस शो'

सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करणं हे सर्रास होत आहे. सोशल मीडियाचा दुरूपयोग करणारे अनेकजण समाजात आहेत.

Updated: Jan 13, 2018, 04:07 PM IST
 तापसी पन्नू घेऊन येतेय 'ट्रोल पुलिस शो'

मुंबई : सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करणं हे सर्रास होत आहे. सोशल मीडियाचा दुरूपयोग करणारे अनेकजण समाजात आहेत.

यासंबधी घडणाऱ्या घटनांवर लवकरच एक टीव्ही शो येत आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हा शो घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. 

अनेक विषय समोर 

ट्रोल करुन एखाद्याचा आत्मविश्वास आपण कमी करतो. केवळ या कारणामुळे महिला परंपरागत चालीरीतींवरच चालतात असे तापसी पन्नू हिने म्हटले आहे. 'ट्रोल पुलिस' च्या माध्यमातून ती अनेक विषय समोर आणणार आहे. 

५ लाख फॉलोअर्स 

अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होणार आहेत. तापसीचे इन्स्टाग्रामवर ५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

एमटीव्हीवर

पहिल्या एपिसोडमध्ये ती लखनौचा विद्यार्थी आशिष ला घेऊन येणार आहे. हा शो शनिवारी एमटीव्हीवर दिसणार आहे.