तैमूरच्या या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा का?

कधी तैमुर आपल्या आई अर्थात करीना सोबत जीममध्ये जातो म्हणून तर कधी त्याच्या अतरंगी अदाकारीने.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2018, 03:35 PM IST
तैमूरच्या या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा का? title=

मुंबई : सोशल मिडियावर तैमूर अली खानची चर्चा ही रोज होतच असते. कधी तैमुर आपल्या आई अर्थात करीना सोबत जीममध्ये जातो म्हणून तर कधी त्याच्या अतरंगी अदाकारीने.

तैमूरच्या हातात कुणाचा फोटो

तैमूर हा  बॉलिवूडच्या इतर अभिनेते-अभिनेत्रींसारखाच सतत चर्चेत असतो. सध्या तैमूरचा असाच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या फोटोत तैमूरने चक्क आपल्या हातात आपल्या वडिलांचा अर्थात सैफ अली खानचा फोटो धरलाय आणि एक टक या फोटोकडे पाहतोय.  

छोटासा पोनीटेल बांधलेल्या तैमूरचे निरागस भाव

निळ्या रंगाचा टीशर्ट, पांढरा पायजमा आणि छोटासा पोनीटेल बांधलेल्या तैमूरचे निरागस भाव या फोटोत बंदीस्त करण्यात आलेत. पापाराझींची सध्या तैमूरचे फोटो घेण्यासाठी स्पर्धा सुरु असते कारण सोशल मिडियावर सर्वाधिक लाईक्स मिळवणारा छोटा मुलगा तैमूर ठरतोय.