टीव्ही अभिनेत्याची नशेत 3 गाड्यांना धडक, 3 जण जखमी

नशेत होता हा टीव्ही अभिनेता

Updated: Jul 22, 2018, 09:43 AM IST
टीव्ही अभिनेत्याची नशेत 3 गाड्यांना धडक, 3 जण जखमी title=

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या बीएमडब्ल्यू कारनं तीन गाड्यांना धडक दिल्याची घटना मुंबईत घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धार्थ स्वतः ही कार चालवत होता आणि तो नशेत असल्याची अशी माहिती समोर आली आहे. गाडी इतक्या वेगात होती की ३ गाड्यांना धडक देऊन दुभाजकावर जोरात आदळली. मुंबईतील ओशिवरा परिसरात ही घटना घडली. 

सिद्धार्थची कार भरधाव वेगात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी सिद्धार्थला अटक केली. बेदरकारपणे भरधाव वेगाने गाडी चालवल्याचा गुन्हा सिद्धार्थवर दाखल करण्यात आला आहे.