SHOCKING : जलोटा-जसलीनच्या रिलेशनशिपविषयी खळबळजनक खुलासा

खुद्द जलोटा यांनी उघड केल्या 'या' गोष्टी 

Updated: Oct 29, 2018, 07:42 AM IST
SHOCKING : जलोटा-जसलीनच्या रिलेशनशिपविषयी खळबळजनक खुलासा  title=

मुंबई : 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या प्रत्येक पर्वाची कलाविश्वात बरीच चर्चा पाहाय़ला मिळते. अशाच चर्चांच्या वर्तुळात बिग बॉसचं यंदाचं पर्वही प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरत आहे. मुख्य म्हणजे 'बिग बॉसचं हे १२' पर्व गाजण्याची कारणं बरीच असली करीही त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे भजन सम्राट अमुप जलोटा आणि त्यांचं प्रेमप्रकरण. 

आपल्याहून वयाने जवळपास ३७ वर्षे लहान असणाऱ्या जसलीन मथारु हिच्यासोबत असणाऱ्या रिलेशनशिपमुळे जलोटा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली.

वादविवाद, चर्चा या साऱ्यांच्याच गोंधळात अखेर जलोटा या घरातून बाहेर पडले. कार्यक्रमाच्या ठरलेल्या स्वरुपानुसार ते बाहेर आले खरे पण, बाहेर येताच त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. 

'बिग बॉस'च्या मंचावर ज्यावेळी जसलीनने आपल्यासोबतच्या रिलेशनशिपचा विषय काढला तेव्हा एक प्रकारचा धक्काच बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्यांनी हा खुलासा केला. 

'माझ्या संपर्कात येण्याच्या अवघ्या काही दिवसांनंतरच जसलीनला बिग बॉसची ऑफर आली. ज्यानंतर तिने माझ्याकडे त्या शोमध्ये पार्टनर म्हणून जाण्याची विचारणा केली. पण, माझं वेळापत्रक अतिशय व्यग्र असल्याचं मी तिला सांगितलं. नंतर तिच्या वडिलांनी आपल्या मुलीसोबत पार्टनर म्हणून या कार्यक्रमात जाण्याची मला विनंती केली. दोन- तिनदा त्यांनी मला विनंती केली अखेर मी तयार झालो. पण, त्यावेळी मी आणि जसलीन गुरु-शिष्य म्हणून कार्यक्रमात जाणार असल्याचं ठरलं होतं', असं जलोटा म्हणाले. 

किंबहुना कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात जेव्हा जलोटा यांनी ऐसी लागी लगन गायलं तोपर्यंतही या रिलेशनशिपविषयी कोणालाच कल्पनाही नव्हती. तुमच्यासोबत कोणी आलं आहे का, असं त्यावेळी सलमानने जलोटा यांना विचारलं. ज्यानंतर जसलिन या आपल्या शिष्येसोबत आपण आल्याचं जलोटा यांनी त्याला सांगितलं. पण, ज्यावेळी जसलिन बिग बॉसच्या मंचावर आली आणि तिने आपल्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं वक्तव्य केलं तेव्हा मला धक्काच बसल्याचा खळबळजनक खुलासा जलोटा यांनी केला आहे. 

ती माझी शिष्याच असल्याची बाब मी वारंवार अधोरेखित करत राहिल्याचं म्हणत जेव्हा जेव्हा रिलेशनशिपच्या चर्चा झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र असल्याचंच मी म्हणत आलो आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. 

जसलिनच्या वडिलांची या सर्व प्रकरणी  आलेली प्रतिक्रिया ही स्वाभाविक होती. कारण, 'बिग बॉस'मध्ये अशा पद्धतीची वळणं त्यांना अपेक्षित नव्हती. 

कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जवळपास सहा दिवस जसलीन फक्त निर्मात्यांच्याच संपर्कात होती. त्याचवेली तिला आमच्या नात्याला रिलेशनशिप असल्याप्रमाणे वागण्याचं सांगण्यात आलं असावं अशी शक्यता जलोटा य़ांनी वर्तवली आहे. 

कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी चर्चेत आलेलं हे प्रेमप्रकरण पाहून खुद्द जलोटा यांच्या कुटुंबीयांनाही धक्काच बसला होता. कारण, यापूर्वी त्यांनी कधी जसलीनला पाहिलंही नव्हतं. 

जलोटा यांनी केलेला हा खुलासा सध्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. या रिअॅलिटी शोला मिळणारा टीआरपी आणि एकंदर लोकप्रियता आता यापुढेही कायम राहते की त्यावर काही परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.