बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 21, 2017, 09:33 PM IST
बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

(सिनेमाचा टीझर पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा हिंदी आणि मराठी भाषेत असणार आहे. या सिनेमात  अष्टपैलू अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार असून 'ठाकरे' असं या बायोपिकचं नाव असणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत सिनेमाची निर्मिती करणार आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनसेचे नेते अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच