या मोठ्या दिग्दर्शकाच्या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी

दिग्दर्शक-निर्माते विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा एक कॉमेडी ड्राम असून या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य निंबाळकर करणार आहे.

Updated: Sep 14, 2017, 07:48 PM IST
या मोठ्या दिग्दर्शकाच्या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई : दिग्दर्शक-निर्माते विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा एक कॉमेडी ड्राम असून या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य निंबाळकर करणार आहे.

आदित्यने या आधी विशाल यांच्यासोबत ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘रंगून’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

आदित्य निंबळकर या सिनेमाच्या स्क्रिप्टवर गेल्या काही दिवसांपासून काम करतो आहे. आदित्यने नवाजला स्क्रिप्ट ऎकवली असून नवाजला ती पसंतही पडली आहे. आदित्य आणि विशाल यांना असं वाटतं की, या भूमिकेसाठी नवाज परफेक्ट आहे. यासोबतच अशीही चर्चा आहे की, या सिनेमात कृति सेनन सुद्धा असणार आहे. 

दरम्यान, ‘ओमकारा’, आणि ‘७ खून माफ’ सारख्या सिनेमांसाठी असिस्टंट राहिलेल्या हनी त्रेहानला विशाल हे दिग्दर्शक म्हणूण लॉन्च करणार आहेत. हनी त्रेहान हा दीपिका पादुकोनला घेऊन माफिया क्वीन रेहाना खानवर आधारित सिनेमाचं दिग्दर्शक करणार आहे. यात दीपिका डॉन राहिमा खान ऊर्फ सपना दीदीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात इरफान खान हा एका लोकल गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसेल. यात या दोघांची प्रेमकथाही असेल.