बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...

Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.

दिक्षा पाटील | Updated: May 22, 2024, 10:52 AM IST
बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Bollywood Most Kanjoos Celebrity : चित्रपट निर्माता आणि कोरियोग्राफर फराह खान तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिला ओळखतात ते सगळे बोलतात की तिच्या मनात जे असतं तेच तिच्या ओठांवर असतं. फराह लवकरच कॉमेडियन कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबत यावेळी अनिल कपूर देखील दिसणार आहे. त्या दोघांशी गप्पा मारत असताना एक मजेशीर गोष्ट सगळ्यांसमोर आली आहे. ते कळल्यानंतर सगळेच प्रेक्षक हे हसू लागले आहे. फराहनं खुलासा केला की बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कंजूस अभिनेता कोण आहे? इतकंच नाही तर त्यांनी त्याचा पुरावा देखील दिला. 

फराह आणि अनिल कपूर हे दोघेही पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. त्या प्रोमोमध्ये आगामी एपिसोडची एक झलक पाहायला मिळाली आहे. जेव्हा कपिल शर्मानं फराह खानला विचारलं की अनिल कपूर आणि फराहमध्ये सगळ्यात जास्त कंजूस कोण आहे? त्यावर उत्तर देत फराहनं विश्वासानं सांगितलं की ते दोघेही दानी आहेत. फराहनं हे देखील सांगितलं की ती सगळ्यांना सांगू शकते की इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कंजूस कोण आहे? यानंतर उत्तर देत फराहनं चंकी पांडेला कॉल केला आणि फोन लाउडस्पीकरवर ठेवला. तर फोनवर तिनं चंकीकडे 500 रुपये मागितलं त्यावर चंकी पांडेची खूप मजेशीर रिअॅक्शन होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराहनं चंकी पांडेला कॉल केला आणि म्हणाली, 'चंकी, ऐकना मला 500 रुपयांची गरज आहे.' हे ऐकताच चंकी म्हणाला, 'तर एटीएमवर जा.' त्यानंतर फराह पुढे म्हणाली, 'चंकी, कमीत कमी 50 रुपये तरी दे.' हे ऐकल्यानंतर तो म्हणाला की, 'हॅलो? कोण पाहिजे? दोघांमध्ये सुरु असलेल्या या मजेशीर गोष्टीनं सगळ्यांना हसू अनावर झालं.' 

दरम्यान, त्यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर फराह खाननं नुकतीच 'छोटा भीम एंड द कर्स ऑफ दमयान' चा ट्रेलर लॉन्च केला. चित्रपटात यज्ञ भसीन, अनुपम खेर, मकरंद देशपांडे, कबीर शेख, अदविक जयसवाल, दैविक डावर, दिव्यम डावर, आश्रय मिश्रा आणि स्वर्णा पांडे देखील आहे. फराहनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. त्यासोबत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट अॅनिमेटेड शो छोटा भीमचा लाइव्ह अॅक्शन अडॅप्शन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव चिलकानं केलं आहे. त्याला राजीव आणि मेघा चिलका यांनी मिळून निर्मिती केली आहे.