'टॉयलेट : एक प्रेमकथा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावलेत १३.१० कोटी

Last Updated: Saturday, August 12, 2017 - 16:52
'टॉयलेट : एक प्रेमकथा' सिनेमाने पहिल्या दिवशी कमावलेत १३.१० कोटी

मुंबई : बॉलीवूडचा स्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. अक्षयच्या या बहुचर्चित सिनेमाने पहिल्या दिवशी १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.

हा सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित आहे. भारतात अद्यापही अनेक ठिकाणी शौचालयाची समस्या कायम आहे. त्यावरच आधारित या सिनेमाची कथा आहे. 

पहिल्या दिवशी या सिनेमाने १३ कोटी कमावले असले तरी शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी सिनेमा चांगली कमाई करेल असा विश्वास वितरकांनी व्यक्त केलाय. 

 

First Published: Saturday, August 12, 2017 - 16:50
comments powered by Disqus