आर्ची पड्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य....

सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपली लाडकी आर्ची.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 04:42 PM IST
आर्ची पड्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य....

मुंबई : सैराट चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपली लाडकी आर्ची. ही आर्ची अनेकांच्या मनावर राज्य करते. अशातच शूटिंग दरम्यान आर्ची पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ही रिंकू राजगुरू नसल्याचा खुलासा खुद्द तिच्या वडिलांनी केला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत धबधब्याजवळ शूटिंग चालू असताना निसरड्या दगडावरून पाय घसरून अभिनेत्री पडल्याचं दिसत आहे. ती पडताच तिची टीम तिच्या मदतीला धावून जात असल्याचे आपल्याला दिसते. मात्र ही अभिनेत्री रिंकू राजगुरू असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या. 

मग ती अभिनेत्री कोण ?
तर त्या व्हिडियोत दिसणारी ही अभिनेत्री रिंकू राजगुरु नसून  लिंडा कुमार आहे. प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक सिद्दीक चेंडमंगलू यांच्या आगामी 'कुंजीरामंट्ये कुप्पायम' चित्रपटातील हा व्हिडिओ आहे. कोझीकोडमधील पेरांबराजवळच्या जानकी जंगलातील हा धबधबा आहे. शूटिंग चालू असताना झालेल्या या अपघातामुळे शूटिंग १० दिवस थांबवण्यात आलं होतं. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close