‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोमॅंटिक गाण्यांचीही सध्या चलती बघायला मिळत आहे. अशातच ‘हेट स्टोरी ४’ या सिनेमातील एक धमाकेदार रोमॅंटिक गाणं रिलीज करण्यात आलंय. 

Updated: Feb 13, 2018, 07:08 PM IST
‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोमॅंटिक गाण्यांचीही सध्या चलती बघायला मिळत आहे. अशातच ‘हेट स्टोरी ४’ या सिनेमातील एक धमाकेदार रोमॅंटिक गाणं रिलीज करण्यात आलंय. 

धमाकेदार रोमान्स

‘तुम मेरे हो’ असे या गाण्याचे बोल चांगलेच आहेत. त्यासोबतच गाण्याचा व्हिडिओ सुद्धा तितकाच सिझलींग आहे. या गाण्याचे बोल मनोज मुंतशीरने लिहिले आहेत तर संगीत मिथुनने दिलं आहे. तर या गाण्याचा जुबीं नौटियाल आणि अमृता सिंह यांनी आपला आवाज दिलाय. विवान भटेना आणि इहाना ढिल्लन यांची जोडी या गाण्यात बघायला मिळत आहे. 

सीरिजमधील चौथा सिनेमा

‘हेट स्टोरी सीरिज’चा हा चौथा सिनेमा आहे. यात विवान भटेना आणि इहाना ढिल्लन यांच्यासोबतच उर्वशी रौतेला, करण वाही आणि गुल्शन ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल पांड्या याने केलंय तर कथा समीर अरोडाने लिहिली आहे.