तुझ्यात जीव रंगला : गावकरी राणासाठी करताय मॅनेजरबाईचा निषेध?

मुंबई : तुझ्यात जीव रंगला मालिकेत सध्या राणाची वेगळीच पळापळ सुरू आहे. इंटरनॅशनल कुस्तीसाठी राणाची तयारी करून घेतली जात आहे. मातीच्या कुस्तीला थोडेदिवस बाजूला सारून राणा सध्या मॅटवरच्या कुस्तीची तयारी करत आहे. पण याकरता आपल्या उत्सादांना बाजूला सारत राणाला कोच आणि मॅनेजर सखीची मदत घ्यायची आहे. आणि हेच राणाला फॉलो करणं थोडं कठीण होत आहे. यातच गावकऱ्यांना सध्या राणाची जी पळापळ सुरू आहे ते काही मान्य नाही. आणि याकरता प्रत्येकजण आपापल्या परिने निषेध करण्याचा प्रयत्न करत आहे. 

तसेच राणाची बच्चे कंपनी देखील मॅनेजरबाईंना धड शिकवण्यासाठी नवा उपद्वाप करतात. मॅनेजर सखीने राणाला तीन वेळा कुस्तीत हरवल्याचा राग या लहान राणाच्या मित्रांना येतो. आणि त्याकरता ते सापळा रचतात. पण या त्यांच्या जाळ्यात राणाच अडकतो. तसेच गावकरी मंडळी मॅनेजर मॅडमला भेटून त्यांनी राणाची माफी मागावी आणि पुन्हा त्याचा अपमान होईल असं काही करू नये असं लेखी पत्र मागतात. पण अवधुत म्हणजे सुरजचा मित्र मात्र सखीला बघून अगदी विचित्र बोलतो. आणि गावकरी निघून जातात. 

पाठकबाई राणाला सांभाळणार का? 

आतापर्यंत आपण पाहिलं आहे पाठक बाई राणाला खूप छान समजून घेतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टी राणा ऐकतो आणि त्याला यश मिळतं. त्यामुळे राणा आता देखील तसंच करणार की नंदिनी वहिनी पुन्हा काही तरी खोडा घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.