दीपिका पादूकोण, कॅटरिना कैफला मागे टाकत 'ही' अभिनेत्री ठरली सेक्सिएस्ट वूमन

लंडनच्या मासिकाने यंदाच्या सेक्सिएस्ट वूमनच्या नावांची यादी घोषित केली आहे.

Dipali Nevarekar | Updated: Dec 7, 2017, 08:28 PM IST
दीपिका पादूकोण, कॅटरिना कैफला मागे टाकत 'ही' अभिनेत्री ठरली सेक्सिएस्ट वूमन

मुंबई : लंडनच्या मासिकाने यंदाच्या सेक्सिएस्ट वूमनच्या नावांची यादी घोषित केली आहे.

सेक्सिएस्ट वूमनच्या या यादीमध्ये दीपिका पादूकोणसह अनेक अभिनेत्रींवर मात करून निया शर्माने यंदाच्या सेक्सिएस्ट वूमनच्या यादीमध्ये आपले नाव पटकावले आहे.  

निया शर्मा सेक्सिएक्स्ट वूमनच्या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. यापूर्वीदेखील नियाने अनेकदा बॉलिवूडच्या अभिनेत्रींवर मात केली आहे.  

कोण आहे निया शर्मा ? 

निया शर्मा ही छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री आहे. 'जमाईराजा', ' 'एक हजारों में मेरी बहना है' अशा मालिकांमधून चर्चेमध्ये आलेलं नाव आहे. 
२०१० साली 'काली' मलिकेतून नियाने टिव्ही क्षेत्रामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं. 

२७ वर्षीय नियाने मालिकांमधून लोकप्रियता मिळवली.  'खतरों के खिलाड़ी 8' के सोबतच  वेब सीरीज 'ट्विस्टेड' मध्येही निया झळकली होती.  त्यामध्ये तिचा बोल्ड अंदाजही बघायला मिळाला होता.  

दीपिका पादूकोण तिसर्‍या क्रमांकावर   

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादूकोणने या यादीमध्ये तिसर्‍या जागी झेप घेतली आहे. या यादीमध्ये आलिया भट आणि माहिरा खान, कॅटरिना कैफ सोबतच श्रद्धा कपूरचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे