'टिप-टिप बरसा पानी...' वर असा डान्स तुम्ही पाहिला आहे का ?

 डायट्टो रेमो डिसूजा ही डान्स रियालिटी शो Dance+ मध्ये होती. 'टिप टिप बरसा पानी' च्या रिमिक्स व्हर्जनवर तिने आपले नृत्य सादर केले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 11, 2017, 06:49 PM IST
'टिप-टिप बरसा पानी...' वर असा डान्स तुम्ही पाहिला आहे का ? title=
डायट्टो रेमो डिसूजा ही डान्स रियालिटी शो Dance+ मध्ये होती.

नवी दिल्ली: सध्या एक अमेरिकन मुलगीने भारतात धुमाकूळ घातला आहे. डायट्टो रेमो डिसूजा असे या मुलीचे नाव असून तिचा जन्म २७ एप्रिल १९९८ मध्ये झाला. डायट्टो रेमो डिसूजा ही डान्स रियालिटी शो Dance+ मध्ये होती. यामध्ये तिने अक्षय कुमार आणि रविना टंडन यांवर चित्रित झालेल्या 'टिप टिप बरसा पानी' या मोहरा चित्रपटातील गाण्यावर मूव्हज केले. 'टिप टिप बरसा पानी' च्या रिमिक्स व्हर्जनवर तिने आपले नृत्य सादर केले. 

डायट्टो स्वतःच्या युनिक डान्स स्टाइलमुळे सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध आहे. यंदाच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्याला २ करोडपेक्षा अधिक व्हिज मिळाले. १९ वर्षांच्या या मुलीचा डान्स पाहून ही नक्की मुलगी आहे की रोबोट हा प्रश्न तुम्हाला पडेल. रोबोट सारखी नाचत असलेली डायट्टोचे नृत्य बघणे, ही एक पर्वणीच आहे. 

मिडियाच्या वृत्तानुसार चियरलीडर आणि जिमनास्ट म्हणून करियरला सुरुवात केलेल्या डायट्टोची पॅशन आहे डान्स. आणि हे तिला खूप लवकर उमगले. ब्रेक डान्स, हिप-हॉप, रोबोटिंग, फिंगर ट्यूटिंगमध्ये डायट्टोचे मूव्हज अप्रतिम असतात.