'परी'शी टक्कर टाळण्यासाठी 'हेट स्टोरी 4' च्या रिलीज डेटमध्ये बदल

बॉलिवूडमध्ये 'पद्मावती'च्या वादानंतर अनेक चित्रपटाच्या रिलीज डेट बदलण्यात आल्या आहेत.

Updated: Jan 13, 2018, 11:19 AM IST
'परी'शी टक्कर टाळण्यासाठी 'हेट स्टोरी 4' च्या रिलीज डेटमध्ये बदल

मुंबई  : बॉलिवूडमध्ये 'पद्मावती'च्या वादानंतर अनेक चित्रपटाच्या रिलीज डेट बदलण्यात आल्या आहेत.

थेट स्पर्धा आणि बॉक्सऑफिसवरील कमाईला होणारा फटका टाळण्यासाठी अनेक चित्रपट रीलीज डेट पुढे ढकलणं अधिक फायद्याचं समजतात.पॅडमॅन, अय्यारी, पद्मावती, परी पाठोपाठ आता 'हेट स्टोरी 4' च्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आला आहे. 

कोणकोणत्या चित्रपटाच्या रिलीज डेट बदलल्या ? 

पद्मावती आणि पॅडमॅनची टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी' हा चित्रपट 26 जानेवारीऐवजी 9 फेब्रुवारीला रिलीज होईल. 

9 फेब्रुवारीला रिलीज होणारा 'परी' हा अनुष्का शर्माचा चित्रपट आता 2 मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

2 मार्चला रिलीज होणारा 'हेट स्टोरी 4' हा चित्रपट आता 9  मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

हेट स्टोरी 4 मधून उर्वशी येणार रसिकांच्या भेटीला 

 

 

'काबिल' या ऋतिक रोशनच्या चित्रपटातून एका आयटम नंबरामधून अभिनेत्री उर्वशी रौतेला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'हेट स्टोरी 4' या चित्रपटामध्ये उर्वशी रौतेलासोबत करण वाहीदेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पांड्या यांनी केलं आहे. 'हेट स्टोरी' चा हा चौथा सिक्वेल आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close