'वीरे दी वेडिंग' टीमसोबत करिना-सोनमने केले खास गाण्याचे शूटिंग...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या वीरे दी वेडिंग सिनेमात एकत्रितपणे झळकणार आहेत.

Updated: Apr 11, 2018, 04:01 PM IST
'वीरे दी वेडिंग' टीमसोबत करिना-सोनमने केले खास गाण्याचे शूटिंग... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या वीरे दी वेडिंग सिनेमात एकत्रितपणे झळकणार आहेत. या चार अभिनेत्रींच्या या सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा  आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतने वाट बघत आहेत. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या सिनेमाची टीम एका स्पेशल गाण्याचे शूटिंग करत आहे. याची माहिती खुद्द सोनम कपूरने दिली आहे.

सोनमने केला खुलासा

अलिकडेच सोनम कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिने या स्पेशल गाण्याचा खुलासा केला. या गाण्याबद्दल ती खूप उत्सुक असून या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तिची आवडती कोरियोग्राफर करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या गाण्याची कोरिओग्राफी फराह खान करत आहे. 

करिनाचे कमबॅक

प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर करिना या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर १९ एप्रिलला प्रदर्शित केला जाईल. हा ट्रेलर फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म वरच नाही तर प्रेस कॉन्फरेंस घेऊन प्रदर्शित केला जाईल.