वीरे दी वेडींगचे नवे पोस्टर प्रदर्शित...

 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा वीरे दी वेडींग सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे. 

Updated: May 19, 2018, 08:15 AM IST
वीरे दी वेडींगचे नवे पोस्टर प्रदर्शित... title=

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा वीरे दी वेडींग सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे. करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया स्टार्रर सिनेमाची यापूर्वी गाणी, पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यात चार मैत्रिणींचे बॉण्डींग दाखवण्यात आले आहे. आता या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये या चारही मैत्रिणींचा हॉट लूक पाहायला मिळतो. यात बीचवर त्या हॉट अवतारात पाहायला मिळतात.

पहा पोस्टर...

 

या सिनेमाची निर्मिती सोनम कपूरची बहिण रिया कपूर हीने केली असून दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. १ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेग्नेंसी ब्रेकवर असलेल्या करिनाचा त्यानंतरचा हा पहिलाच सिनेमा आहे तर सोनमच्या लग्नानंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे.