व्हिडिओ : समुद्रकिनारी धोतर नेसून काय करतोय अक्षय कुमार ?

अक्षय कुमारने रविवारी स्वत:चा फोटो शेअर करत छानसे कॅप्शनही दिले. या फोटोत तो खूप आनंदात दिसतोय.

Updated: Dec 11, 2017, 11:05 AM IST
व्हिडिओ : समुद्रकिनारी धोतर नेसून काय करतोय अक्षय कुमार ? title=

मुंबई : अक्षय कुमारने रविवारी स्वत:चा फोटो शेअर करत छानसे कॅप्शनही दिले. या फोटोत तो खूप आनंदात दिसतोय. "एक चांगली सुरूवात झाल्यास शेवटही चांगलाच होतो, असे त्याने लिहिले आहे. 

'गोल्ड''ची शूटींग पूर्ण झाली. खूप चागंल्या टीमसोबत अविश्वसनीय प्रवास. सिनेमात तुमच्याशी भेट होईलच." या ओळी त्याने फोटोसोबत जोडल्या आहेत.

गोल्ड

'गोल्ड' सिनेमा हा टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिचा हा पहिला बॉलीवूड सिनेमा ठरणार आहे. यात अमित साध मुख्य भूमिकेत आहे.

१९४८ मध्ये लंडनमधील १४ व्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले ऑलम्पिक जिंकण्यासंदर्भात हा सिनेमा आहे. २०१८ मध्ये हा सिनेमा रिलीज होईल. 

पॅडमॅन 

दरम्याान अक्षय कुमारचा पॅडमॅनही रिलीजच्या मार्गावर आहे. पॅडमॅन या सिनेममाची कहाणी अरुणाचलम मुरुगनाथम नावाच्या व्यक्तिच्या आयुष्यातून प्रेरीत आहे.

अरुणाचलम यांनी महिलांसाठी परवडणाऱ्या किंमतीत सॅनेटरी नॅपकीन बनविण्यासाठी खूप वर्षे संघर्ष केला.  त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले.

'पागल सुपरमॅन'

सिनेमात अरुणाचलमचे कॅरेक्टर अक्षय कुमार करत असल्याने त्याने 'पागल सुपरमॅन' असे कॅप्शन दिलेले पोस्टरही शेअर केले होते. 

२६ जानेवारीला रिलीज

या सिनेमात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २६ जानेवारी २०१८ हा सिनेमा रिलीज होणार आहे.