Video: रणवीर सिंंह नव्हे तर अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेतील 'या' कलाकाराचे फोटो व्हायरल

संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावत' या  चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंहच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले.

Updated: May 19, 2018, 06:28 PM IST
Video: रणवीर सिंंह नव्हे तर अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेतील 'या' कलाकाराचे फोटो व्हायरल title=

मुंबई : संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावत' या  चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंहच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले. या भूमिकेमध्ये रणवीर सिंहने खास छाप सोडली आहे. मात्र रणवीर इतकीच या भूमिकेतील वेषभूषेत असलेल्या एका कलाकाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अविश्वसनीय फोटो 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे पाहून अनेकांना तो पहिल्यांदा रणवीर सिंह वाटला. मात्र हा कलाकार रणवीर नव्हे तर हिंदी टेलिव्हिजनवरील रवी दुबेचा आहे. 'जमाई राजा' फेम अभिनेता गेले काही दिवस टेलिव्हिजनवर होस्टच्या भूमिकेत दिसत आहे. 

लवकरच टेलिव्हिजनवर एक नवा कार्यक्रम येणार आहे. या कार्यक्रमाचा होस्ट रवी दुबे असणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये रवी दुबे 'अल्लाउद्दीन खिल्जी'च्या अवतारामध्ये दिसला आहे. 

 

 

सबसे स्मार्ट कौन ? चा होस्ट 

रवी दुबे हिंदी टेलिव्हिजनवर 'सबसे स्मार्ट कौन?' हा नवा गेम शो घेऊन येणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो रिलिज करण्यात आला आहे.