PHOTO : 'बिग बॉस' स्पर्धकासोबत सारा अली खानचा बिकीनी फोटो वायरल

बिग बॉस सीझन ११ मध्ये शेवटच्या तीन सहभागींमध्ये दिसलेल्या विकास गुप्ताचा एक जुना फोटो सध्या वायरल होताना दिसतोय.

Updated: Jan 16, 2018, 04:20 PM IST
PHOTO : 'बिग बॉस' स्पर्धकासोबत सारा अली खानचा बिकीनी फोटो वायरल title=

मुंबई : बिग बॉस सीझन ११ मध्ये शेवटच्या तीन सहभागींमध्ये दिसलेल्या विकास गुप्ताचा एक जुना फोटो सध्या वायरल होताना दिसतोय.

या फोटोत विकाससोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बिकिनीमध्ये दिसतोय. सारा ही सैफची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. सारा आणि विकासचा हा फोटो जुना असला तरी तो पुन्हा एकदा सोशल मीडियावासियांचं लक्ष वेधून घेतोय. 

'डीएनएइंडिया.कॉम'नं दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो काही महिन्यांपूर्वी खुद्द विकासनंच सोशल मीडियावरून शेअर केला होता. त्यादरम्यान सारा सिनेमांत काम करणार असल्याची चर्चा सुरू होती. विकासनं हा फोटो शेअर केल्याबरोबर काही वेळातच तो वायरल झाला... त्यावर अनेक प्रकारच्या कमेंटसही आल्या. त्यामुळे विकासनं लगेचच आपलं ट्विट डिलीट करून टाकलं. 


विकास आणि सारा 

'बिग बॉस'चे फायनलिस्ट शिल्पा शिंदे आणि हिना खान यांना विकासनं जोरदार टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. विकास 'अॅन्ड टीव्ही'चा चॅनल हेड राहिलाय. यादरम्यानंच एका कार्यक्रमावरून शिल्पा शिंदे आणि विकासचा वाद झाला होता. त्यामुळेच शिल्पावर टीव्ही इंडस्ट्री सोडण्याची वेळ आली. आता मात्र बिग बॉस जिंकल्यानंतर शिल्पासाठी अनेक संधींनी आपले द्वार खुले केलेत.