विरूष्काने इथे साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस

शुभेच्छा देण्यासाठी यांची खास उपस्थिती 

विरूष्काने इथे साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस  title=

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 11 डिसेंबर रोजी आपली पहिली अॅनिवर्सरी साजरी केली. या दोघांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मीडियासोबत लग्नानंतरचे अनुभव शेअर केले. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का विराटसोबत ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पहिल्यांदा तिकडचे प्लान समोर आले आहेत. 

अनुष्का गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'झिरो' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. अगदी बिझी शेड्युलमधून वेळ काढून अनुष्का ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. या ठिकाणी इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच सुरू आहे. यामुळे कोहलीला कुठे दुसरीकडे जाणं तरी शक्य नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार, हे कपल संध्याकाळी वेळ काढून Lakeshore झीलच्या किनाऱ्यावर गेले. जिथे त्यांनी डॉल्फिनसोबत आपली पहिली अॅनिवर्सरी साजरी  केली. विराटने अनुष्कासाठी ही सगळी तयारी केली होती. तयारी केलेल्या आयोजकांनी याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या आयोजकांनी फोटो शेअर करताना म्हटलं की, आमच्यासाठी ही खूप सन्मानाची बाब आहे की, पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी आम्ही करू शकतो. आमच्यासाठी ही खूप कौतुकाची बाब आहे.

इटली शहरातील फ्लोरेंसच्या बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये या दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न केलं. अतिशय खाजगी पद्धतीने हा सोहळा पार पडला. पण या लग्नाची जादू आजही चाहत्यांच्या मनावर आहे. 

आज या दोघांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. अनुष्काने आपल्या लग्नाचे खास क्षण व्हिडिओच्या रुपात सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओतून आपल्याला त्या दोघांच प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित होतो.