जेव्हा मेनकाचा मोबाईल चोरी होतो...

तुझं माझं ब्रेकअप ही मालिका सध्या टीआरपीमध्ये पहिल्या पाच स्थानांमध्ये आहे. 

Updated: May 25, 2018, 05:16 PM IST
जेव्हा मेनकाचा मोबाईल चोरी होतो... title=

मुंबई : तुझं माझं ब्रेकअप ही मालिका सध्या टीआरपीमध्ये पहिल्या पाच स्थानांमध्ये आहे. मालिकेची कथाही लोकांना आवडतेय. त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस येतात. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली मेनका अर्थात मीरा जोशी खलनायिका म्हणून चांगलीच प्रसिद्ध झालीये. या मालिकेने तिला नवी ओळख मिळवून दिलीये. या मालिकेच्या निमित्ताने मेनका अर्थात मीरा जोशी मालिका मसालामध्ये आली होती. यावेळी तिने प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी तिने तिच्या मोबाईल चोरीचा किस्सा सांगितला. एका ज्वेलरी ब्रँडच्या शूटसाठीच्या मीटिंगसाठी ती ओशिवारा येथील हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी त्या संबंधित व्यक्तीने आपल्या फोनवरुन क्लायंटला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र तो लागत नव्हता म्हणून त्याने मीराचा फोन मागितला आणि त्या व्यक्तीने मोबाईल घेत तेथून पळ काढला. त्या चोराच्या मागे मीरा पळत गेली. तिच्यामागे वेटर. असा काहीसा फिल्मी सीन झाला होता. मीराचा फोन नवीन असल्याने त्या चोराला फोन स्विच ऑफ करता आला नाही. मीराने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नशीबाने तिचा फोन ट्रॅक झाला. अशा पद्धतीने मीराला तिचा मोबाईल परत मिळाला. छोट्या पडद्यावरील मीराच्या चेहऱ्याला प्रेक्षकांनी सकारात्मकपणे स्वीकारलंय. कुणीही गॉडफादर नसताना मीराने या इंडस्ट्रीत आपले पाय भक्कमपणे रोवलेत. यापुढे तिचे अनेक चित्रपट आहेत यातून ती नव्यानव्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. मीराला नृत्याची प्रचंड आवड आहे. तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलाय. तसेच अनेक रिअॅलिटी शोजमध्ये तिने कोरिओग्राफी सुरु आहे.