अन रणवीर सिंह मुलींचं जॅकेट घालून आला....

रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील सध्या आघाडीचा तरूण कलाकार आहे. 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून रणवीरच्या अभिनय  कौशल्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या फॅशन स्टेटमेन्टचीही चर्चा होत आहे.  

Updated: Feb 9, 2018, 03:57 PM IST
अन रणवीर सिंह मुलींचं जॅकेट घालून आला....

 मुंबई : रणवीर सिंह हा बॉलिवूडमधील सध्या आघाडीचा तरूण कलाकार आहे. 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातून रणवीरच्या अभिनय  कौशल्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच त्याच्या फॅशन स्टेटमेन्टचीही चर्चा होत आहे.  

 अनेक अवॉर्ड शोमध्ये विचित्र फॅशनमध्ये रणवीर  

 अनेकदा अवॉर्ड शो आणि पार्ट्यांमध्ये रणवीर सिंह आगळ्यावेगळ्या थ्री लेअर सूटमध्ये दिसला होता. आता रणवीर चक्क एका मुलींच्या गुलाबी जॅकेटमध्ये दिसला आहे. 

गुरूवारी खास सोहळ्यात सहभाग 

गुरूवारी रणवीर एका खासगी सोहळ्यात सहभागी झाला होता. तेव्हा त्याने सफेद टीशर्ट आणि पॅन्टवर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. या अंदाजामध्ये रणवीर 'रॉकिंग' दिसत होता. एमयूडी स्टुडिओच्या ओपनिंगला आलेल्या रणवीर सिंहचे हे जॅकेट मूळात लेडीज जॅकेट आहे. 

 

 गुलाबी रंग मुलींचा 

 सामान्यपणे गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा असा अलिखित नियम आहे असे मानले जाते. पण रणवीर त्याला अपावाद आहे. स्प्रिंग 2018 मध्ये मनीष अरोराने महिलांसाठी हे जॅकेट डिझाईन केले होते.  

 रणवीरचे आगामी प्रोजेक्ट्स   

 रणवीर सिंहच्या 'पद्मावत'ने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. यानंतर रणवीर झोया अख्तरच्या 'गली बॉय'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा दिसणार आहे. लवकरच रणवीर 1983 वर्ल्डकपवर आधारित '83' या कबीर खानच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर रोहित शेट्टीच्या 'सिंबा' मध्ये तो पोलिसांची भूमिका साकारणार आहे.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close