कँसरग्रस्त मुलाला भेटण्यासाठी जेव्हा अचानक पोहोचला सलमान खान

सलमान खानकडून माणुसकीचं दर्शन 

Updated: Nov 8, 2018, 03:11 PM IST
कँसरग्रस्त मुलाला भेटण्यासाठी जेव्हा अचानक पोहोचला सलमान खान

मुंबई : सलमान खान अचानक जेव्हा एका कँसरग्रस्त मुलाला भेटण्य़ासाठी पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित अनेकांना झटका बसला. सलमान खानचा या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान खान हा अभिनयाशिवाय त्यांच्या बिइंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी देखील ओळखला जातो. सलमान खानने पुन्हा एकदा आपलं मोठं मन दाखवून दिलं आहे. सलमानने एका छोट्या मुलाची भेट घेतली. जो कँसरशी लढतो आहे. हा मुलगा सलमान खानचा मोठा फॅन आहे. त्याला सलमानला भेटण्याची इच्छा होती. 

सलमानच्या या भेटीची सध्या चर्चा आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खान या दरम्यान त्या मुलाला हसवण्याचा प्रयत्न करत आहे. गोविंदा नावाच्या एका व्यक्तीने सलमानला आग्रह केला होता की त्याने एकदा त्याच्या भाच्याला येऊन भेटावं. सलमानने त्याचा ही विनंती पूर्ण केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This video is one of the reason why people love him. Govind had requested Salman Khan to visit his wife's nephew who's at Tata Memorial Hospital and he not only met him also met other kids who were admitted there. YOU'RE THE BEST HUMAN BEING @BeingSalmanKhan i love you forever bhai . Govind, eşinin hastanede yatan yeğenini ziyaret etmesi için Salman'dan istekte bulunmuş. Salman az önce hastaneye gidip onu ziyaret etti. Sadece onla kalmayıp diğer çocuklarla da tanıştı İşte bu sebepten dolayı Salman'ı herkes seviyor. Altın gibi bir kalbi var Ne mutlu bize, böyle bir adamın hayranı olduğumuz için... - #SalmanKhan #BeingSalmanKhan #Salman #BeingHuman #Bollywood #Bharat #tigerzindahai #race3 #duskadum #duskadum3 #salmankhankijaiho #salmankhanfans #salmankhanturkey #salman_khanfanforever #salmankhanrules #salmankhanno1worldwide  #biggboss #biggboss12

A post shared by salman_khan 143 (@salman_khanfanforever) on

सलमान खान या मुलाला भेटण्यासाठी थेट रुग्णालयात पोहोचला. सलमानने या दरम्यान इतर मुलांची देखील भेट घेतली. सध्या सलमान खान 'बिग बॉस'-12, 'भारत', 'किक 2' या सिनेमांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तरी त्याने वेळ काढून या मुलाची भेट घेतली.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close