'गल्ली बॉय' चं शूटिंंग संपल्यानंतर रणवीर सिंंहने असंं केलं सेलिब्रेशन

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट ही जोडी लवकरच 'गली बॉय' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या दोघांच्याही भूमिकेबाबत गुप्तता पाळण्यात आलेली असली तरीही चित्रपटाचा शुटिंगचा टप्पा आता संपलेला आहे. 

Updated: Apr 22, 2018, 09:06 AM IST
'गल्ली बॉय' चं शूटिंंग संपल्यानंतर रणवीर सिंंहने असंं केलं सेलिब्रेशन title=

मुंबई : रणवीर सिंह आणि आलिया भट्ट ही जोडी लवकरच 'गली बॉय' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या दोघांच्याही भूमिकेबाबत गुप्तता पाळण्यात आलेली असली तरीही चित्रपटाचा शुटिंगचा टप्पा आता संपलेला आहे. 

रणवीरने शेअर केला खास फोटो 

चित्रपटाच्या शुटींगचा टप्पा पार पाडल्यानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या रणवीर सिंहने सहकलाकारांसोबत सेलिब्रेशन केले आहे. 
जोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमामध्ये रणवीर सिंह एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये कल्की केंकला आणि सिद्धांत चतुर्वेदी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

 

टीमसोबत धम्मालमस्ती 

'प्यार किया तो निभाना पड़ेगा'  या गाण्यावर रणवीर सिंह थिरकताना दिसला. या सेलिब्रेशनमध्ये आलिया भट्ट मात्र नव्हती. आलिया  तिच्या आगामी 'राजी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  

14 फेब्रुवारीला होणार रीलिज  

जोया अख्तर दिग्दर्शित 'गल्ली बॉय' हा सिनेमा पुढील वर्षी 14 फेब्रुवारीला रीलिज होण्याची शक्यता आहे. रणवीरसोबत जोया अख्तरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी रणवीर ' दिल धडकने दो' चित्रपटात झळकला होता.