झी युवाच्या गुलमोहरमध्ये ‘पूर्ण अपूर्ण’ प्रेमकथा

 झी युवा ही वाहिनी नेहमीच युथफूल आणि फ्रेश मालिकांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधननसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर.

झी युवाच्या गुलमोहरमध्ये ‘पूर्ण अपूर्ण’  प्रेमकथा

मुंबई : झी युवा ही वाहिनी नेहमीच युथफूल आणि फ्रेश मालिकांद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आली आहे. गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधननसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर.

या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  या वेळी गुलमोहर ही मालिका पहिल्याप्रेमाची भावना साजरी करण्यासाठी आगामी कथा  'पूर्ण अपूर्ण' द्वारे सज्ज झाली आहे. ‘पूर्ण अपूर्ण’ ही कथा फ्रेशर्स फेम दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे.

ही कथा तिच्या नावाप्रमाणेच निनाद आणि सावनी यांच्या अपूर्ण प्रेमकथे भोवती फिरते, जे अचानकपणे पुन्हा एकदा भेटतात. निनाद हे पात्र रंगविले आहे खुद्द दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आणि अभिनेत्री मधुरा वेलणकरनेसावनीचे पात्र साकारले आहे. 
सावनी आणि निनाद एकाच कॉलेज मध्ये शिकत असतात, त्यांचा मित्रपरिवार देखील एकच असते. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होत, पण शेवटपर्यंत ते दोघेही त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत नाहीत. निनाद आणिसावनीचे कॉलेज नंतर मार्ग वेगळे होतात आणि मग ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. निनादचे लग्न होते आणि त्याच्या सुखी परिवारात एका गोड परीचे आगमन देखील होते.

सावनीदेखील तिच्या वैवाहिक आयुष्यात मग्नहोते. निनादच्या मुलीला कले मध्ये खूप रस असल्यामुळे ती चित्रकलेच्या क्लासला जात असते. एके दिवशी, जेव्हा निनादच्या बायकोला बरे वाटत नसल्यामुळे निनाद स्वतः मुलीला सोडायला जातो आणि तेव्हा त्याला कळते की तिचीड्रॉईंग टीचर दुसरी तिसरी कोणी नाही तर सावनी आहे. सावनी आणि निनाद एकमेकांबद्दलच्या भावना आता व्यक्त करू शकतील का? की त्यांची प्रेमकथा तशीच अपूर्ण राहील? पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी, पहायला विसरु नका, गुलमोहर प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close