हे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर

जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.

Updated: Jan 19, 2018, 01:41 PM IST
हे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर

मुंबई : जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.

राजकारण्यांची मुलं परदेशी शाळा, कॉलेजात शिकतात आणि इथली सामान्य मुलं यांच्या जाती-धर्माच्या जाळ्यात अलगद गुंफली जातात. तुम्ही त्यांच्या कह्यात येऊ नका, असं आवाहन नानानं नागरिकांना केलंय. 

त्याचबरोबर वातावरण बिघडवणाऱ्या फिल्म हव्यात कशाला? असा 'पद्मावत'च्या वादाबाबत भन्साळींनाही टोला मारलाय. 

'आपला मानूस' या नव्या सिनेमाच्या निमित्ताने नाना 'झी २४ तास'शी बोलत होते. या सिनेमात नाना एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close