अॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...

 तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात

Updated: Jun 15, 2017, 07:46 PM IST
अॅसिडीटी आणि वजन कमी करायचे असेल, तर हे करा...

मुंबई : तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्याचं टेन्शन आलं असेल, तर सकाळी सकाळी कोमट ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून प्यायला सुरूवात करा, सकाळी लवकर उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू पाणी घ्या.

तुम्हाला पोटाचे गंभीर विकार असल्याचं हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. लिंबू पाण्यामुळे एका आठवड्यातच तुम्हाला अॅसिड़ीटीपासून मुक्तता मिळू शकते, तसेच शरीरातील फॅटस कमी करण्यातही मोठी मदत होते.

लिंबू आणि कोमट पाण्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो. किडनीशी संबंधित तक्रारी देखील दूर होण्यास मदत होते. अन्न पचनात मोठी मदत होते. 

एकदा हा प्रयोग करून पाहा, आठवड्याभरात फरक पडेल, लिंबू पाण्यात चमचाभर मध घेतल्यास आणखी मोठा फायदा होतो. फक्त कोमट पाण्यात लिंबू घेतांना ते जास्त फ्रेश आणि रसरशीत असतील याकडे लक्ष द्या.