प्रदूषित हवेत व्यायाम करणाऱ्यांनो सावधान !

एका संशोधनानुसार प्रदूषित हवेत व्यायाम केल्याने फुत्फुसाचे तसेच ह्रदयाचे आजार बळवण्याची शक्यता असते.

Updated: Dec 7, 2017, 08:04 PM IST
 प्रदूषित हवेत व्यायाम करणाऱ्यांनो सावधान !

लंडन : एका संशोधनानुसार प्रदूषित हवेत व्यायाम केल्याने फुत्फुसाचे तसेच ह्रदयाचे आजार बळवण्याची शक्यता असते.

"द लॅंसेट" मासिकातलं संशोधन

चांगलं आरोग्य लाभावं म्हणून लहान थोर सर्वच मोकळ्या हवेत फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी जातात. परंतु "द लॅंसेट" या मासिकातल्या संशोधनानुसार प्रदूषित हवेत व्यायाम केल्याने त्यात असलेले वेगवेगळे घातक कण आणि विषारी वायू शरीरात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जातात.  

व्यायामाचे नाही अपाय

या संशोधनानुसार प्रदूषित हवेत व्यायाम केल्याने एरवी मिळणारे व्यायामचे फायदे तर मिळतच नाहीत पण घातक कण आणि विषारी वायू श्वसनावाटे शरीरात जातात. याचा परिणाम होऊन श्वसनाचे तसच ह्रदयाचे आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे व्यायामाचे फायदे शरीराला मिळत नाहीत.

ज्येष्ठांना जास्त धोका

प्रदूषित हवेचा आरोग्यवर होणारा परिणाम सर्वच वयोगटांवर असला तरी त्याचा विशेष परिणाम हा ज्येष्ठ नागरिकांवर होतो. तसच त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रदूषित हवेचा धोका त्यांना मोठा असतो.