पावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी आयुर्वेदीक उपाय

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यानंतर केवळ व्हायरल इंफेक्शन नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडते. अनेकांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात केसगळतीचा त्रास वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच केसगळतीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आहारात वेळीच सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. 

Updated: Aug 9, 2018, 01:58 PM IST
पावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी आयुर्वेदीक उपाय  title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यानंतर केवळ व्हायरल इंफेक्शन नव्हे तर केसांचे आरोग्यही बिघडते. अनेकांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात केसगळतीचा त्रास वाढल्याचे दिसून येते. म्हणूनच केसगळतीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यासाठी आहारात वेळीच सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. 
आहारात बदलांसोबतच आयुर्वेदातील काही औषधी वनस्पती, फळांचा आहारात समावेश करणं हितकारी आहे. त्यामुळे पहा पावसाळ्यातील केसगळती तुम्ही कशाप्रकारे रोखू शकाल? 

पावसाळ्यातील केसगळती रोखण्यासाठी खास उपाय - 

भृंगराज 

मजबूत आणि घनादाट केसांसाठि भृंगराज अतिशय फायदेशीर आहे. भृंगराज तेलामुळे केवळ टकलेपणाच्या समस्येवर नियंत्रण ठेवता येते असे नव्हे तर अकाली केस पांढरे होण्याची समस्यादेखील आटोक्यात ठेवण्यास मदत होते.  

ब्राम्ही 

ब्राम्ही आणि दह्याचा पॅक केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फयादेशीर आहे. यामुळे केसगळती कमी होण्यास मदत होते. ब्राम्हीचं तेलही केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. नियमित ब्राम्हीच्या तेलाचा मसाज केल्याने केस घनदाट होतात. 

आवळा 

आवळ्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन घटक केसांना मजबूत करण्यासाठी मदत करते. आवळ्याला हीना, ब्राम्हीची पावडर, दही यामध्ये मिसळून लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते. 

कडूलिंब 

कडूलिंबाची पानंदेखील केसांना घनदाट करण्यासाठी मदत करतात. कडूलिंबाची पावडर, दही आणि नारळाचं तेल एकत्र करून लावल्यास केस मजबूत होतात. 

रीठा 

रीठाचा वापर केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी होतो. त्यामुळे रीठाची पावडर तेलामध्ये मिसळून डोक्याला मसाज केल्यास केसगळती रोखण्यास मदत होते. 

टीप -  हे सारे आयुर्वेदीक उपाय असल्याने तुमच्या नजीकच्या उत्तम आयुर्वेदीक भंडारामधून विकत घ्या.