कॅन्सरवर ठरणार केळ्याची पानं फायदेशीर, बीएचयूमध्ये संशोधन

कॅन्सर हा एक दुर्धर आजार असल्याने याबद्दल अनेकांच्या भीती असते. 

Updated: May 25, 2018, 07:10 PM IST
कॅन्सरवर ठरणार केळ्याची पानं फायदेशीर,  बीएचयूमध्ये संशोधन  title=

मुंबई : कॅन्सर हा एक दुर्धर आजार असल्याने याबद्दल अनेकांच्या भीती असते. मात्र आजकाल प्रगत तंत्रज्ञानाने आणि औषध क्षेत्रातील नव्या संशोधनामुळे वेळीच कॅन्सरचं निदान करणं आणि काही प्रमाणात त्यावर नियंत्रण मिळवणं सुकर झाले आहे. काशी हिंदू विश्वविद्यालयातील खुशबू प्रियाने केलेल्या संशोधनानुसार, केळ्याच्या पानात सिल्वर नायट्रेटद्वारा तयार झालेल्या नॅनो पार्टिकल्समुळे कॅन्सरची निर्मिती करणार्‍या पेशींचा नाश होण्यास मदत होते. बीएचयूमधील डॉ. गीता राय यांच्या मदतीने सुमारे वर्षभर प्रियाने टिश्यू कल्चर लॅबमध्ये अभ्यास केला. 

कॅन्सरचा सामना करण्यासाठी केळ्याची पानं फायदेशीर  

केळ्याच्या पानात सेकेंड्री मेटाबोलाईट्स आणि सिल्वर नायट्रेट घटक  यांचा समावेश करून केमिकल विरहित नॅनो पार्टिकल्स तयार केले जातात. कॅन्सर सेल लाईन आणि कॅन्सर ट्युमरवर नॅनो पार्टिकल्सचा प्रयोग करण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. 

औषधी स्वरूपात काम करतील नॅनो पार्टिकल्स   

नॅनो पार्टिकल्स भविष्यात कॅन्सरवरील पर्यायी औषध म्हणून काम करेल. कॅन्सर सेल नष्ट करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, स्कॅनिंग इलेक्ट्रोस्कॉपी, ट्रान्समिशन, एक्स रे डिफरेक्शन यांमध्ये असे सांगण्यात आले आहे.  

कसा लागला शोध 

नॅनो पार्टिकल तयार केल्यानंतर तीन स्तरांवर शोध केला जातो. कॅन्सर सेलमध्ये नॅनो पार्टिकल सोडले जातात. हे पार्टिकल्स 24-48 तासामध्ये सुमारे 50 % कॅन्सर सेल्स नष्ट करतात. त्याचा परिणाम सामान्य सेल्सवरही होतो. या नॅनो पार्टिकल्सचा परिणाम सामान्य सेल्सवर होत नाही. हा दावा लवकरच जर्नलमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.