'या' सवयी असलेल्या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत

6 सवयी तुम्हाला तर नाहीत ना

'या' सवयी असलेल्या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत title=

मुंबई : नातं म्हटलं की कधी तुझं खरं कधी माझं खरं अस आलंच. पण अनेकदा रिलेशनशिपमध्ये आपण असं पाहतो की, मुलींच्या भावनांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. मुलीला कोणत्या गोष्टी आवडतील आणि कोणत्या नाही याचा विचार केला जातो. पण मुलाचा विचार फार कमी केला जातो. मुलांच्या मतांना त्यांच्या विचारांना दुर्लक्ष केला जातो. अनेक नात्यात असं असतं की, सगळ्या गोष्टींची सुरूवात ही मुलानेच करावी. अगदी प्रपोझ देखील मुलानेच करावे असं सांगितलं जातं. अनेकदा मुलं तडजोड करतात मात्र मुलींच्या काही ठराविक सवयींमध्ये मुलं तडजोड करू शकत नाहीत. त्या गोष्टी खालील प्रमाणे 

१)  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संशय. चांगल्या नात्यातला गोडवा कमी करणारी गोष्ट संशय. या संशयामुळे अनेक लोकांचे संसार उद्धवस्त झाल्याचे पाहिले आहेत.  मुलांना प्रत्येक गोष्टीत संशय व्यक्त करणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. याशिवाय थोडथोड्या गोष्टींवर अ‍ॅटिट्यूड दाखविणाऱ्या मुलींपासूनही मुले चार हात लांब राहणेच पसंत करतात. या गोष्टीचा मुलींनी अधिक विचार करावा. 

२) रिलेशनमध्ये थोडीफार भांडण-तंटे सामान्य गोष्ट आहे. मात्र ही गोड भांडणे एका मर्यादेत राहिली तर ठिक आहे. बऱ्याच मुली अगदी शुल्लक गोष्टींवरदेखील खूप संताप व्यक्त करतात. हीच गोष्ट बऱ्याच मुलींना आवडत नाही. कारण वाद विकोपाला नेणारी मुलगी मुलांना आवडत नाही. 

३) बऱ्याच मुली मुलांचे स्वातंत्र्य अप्रत्यक्षपणे हिरावण्याचा प्रयत्न करतात. त्याचे मनमोकळे बोलणे, हसणे, गप्पा मारणे याच्यावर काही मुली बंधने लादण्याचा प्रयत्न करतात. त्यातच जर तो एखाद्या अन्य मुलीशी गप्पा मारत असेल तर ही गोष्ट तिला अजून जास्त खटकते आणि त्याच्याशी अबोला धरते. अशा मुलीही मुलांना आवडत नाहीत.

४) ज्या मुलींसाठी फक्त पैसा सर्वकाही आहे, अशा मुलींपासून मुले नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शिवाय प्रमाणापेक्षा जास्त परंपरांना मानणाऱ्या मुली देखील मुलांना बोर करतात.

५) बऱ्याच मुलींना मुलांसोबत फ्लर्ट करण्याची सवय असते. मात्र अशा मुलींना मुले अजिबात लाइफ पार्टनरच्या रुपात पाहत नाहीत. कोणत्याच मुलाची इच्छा नसते की, त्याच्या गर्लफ्रेंडने दुसऱ्या अन्य मुलासोबत फ्लर्ट करावे.

६) मुलांना फक्त शारीरिक आधार हवा नसतो तर त्या बरोबरच मानसिक आधार हवा असतो. त्यामुळे मुलांना समजून घेणे गरजेचे आहे.