इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत !

नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात. 

Updated: Aug 14, 2018, 11:02 AM IST
इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत !

मुंबई : नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात. जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडते तेव्हा तिला इम्प्रेस करण्यासाठी ते सारे प्रयत्न करतात. प्रेमात आणि युद्धात सारं माफ असतं असे म्हटले जाते, त्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी इम्प्रेशन मारण्याच्या नादात काही मुलं खोटंही बोलतात. मग पहा कशा कोणकोणत्या गोष्टींबाबत मुलं खोटं बोलतात. 

1.पसंत - नापसंत 

सुरूवातीला सहाजिकच तुम्ही एकमेकांच्या पसंत-नापसंतीवर चर्चा करता. इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं तिच्या आवडीनुसार स्वतःच्या आवडी निवडीचा विचार करतात. याबाबतीत मुलं खोटं बोलतात. 

2. भूतकाळ 

अनेकदा मुलं त्यांच्या भूतकाळाबद्दल फार स्पष्टपणे बोलणं टाळतात. समोरच्या व्यक्तीला वर वर पाहता जितकी आवश्यक माहिती असते तितकीच दिली जाते. त्यामुळे ब्रेकअपची खरी कारणं फार स्प्ष्टपणे सांगत नाहीत. 

3 फीटनेस  

फीटनेसच्या बाबतीतही मुलं खोटं बोलतात. अनेकदा मुलींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं फुशारक्या मारतात. 

4. पगार 

इम्प्रेशन मारण्याची सवय किंवा तयारीत असणार्‍यांमध्ये पगारापेक्षा खर्च अधिक दाखवणं, परिवाराच्या स्टेट्सबाबत बोलून चढवून बोलणं ही सवय असते. 

5. मित्रपरिवार 

मुलींच्या मैत्रिणी आवडत असल्याचं नाटक करणं मुलांना चांगलं जमतं. 

6. आठवणं येणं 

सतत आठवणींमध्ये असण्याबाबतही मुलं खोटं बोलतात. 

7. स्त्रिवादी असणं 

अनेकदा केवळ मुलींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी मुलं ते स्वतः स्त्रीवादी असल्याचं केवळ सांगतात. प्रसंगी भूमिका घेण्याची वेळ आल्यानंतर मात्र त्यांचा 'स्त्रीवाद' गळून पडतो. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close