नवीन वर्षात हेल्दी त्वचेसाठी मिळवण्यासाठी तुमच्या 'या' सवयी बदला!

सुंदर, तजेलदार त्वचेचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 12, 2018, 03:47 PM IST
नवीन वर्षात हेल्दी त्वचेसाठी मिळवण्यासाठी तुमच्या 'या' सवयी बदला! title=

मुंबई : सुंदर, तजेलदार त्वचेचे स्वप्न प्रत्येक मुलगी बघते. नवीन वर्षात हेल्दी, मुलायम त्वचा मिळवण्याचा तुमचा संकल्प असल्यास तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील. हेल्दी त्वचा हे तुमच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. त्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील...

चेहरा जास्त वेळा धुवू नका :

तेलकट त्वचा असलेल्या मुली तेलकटपणा कमी करण्यासाठी खूप वेळा साबण लावून चेहरा धुतात. मात्र साबण अॅसिडिक असल्याने चेहऱ्याच्या त्वचेचे पीएच संतुलन बिघडू शकते. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा अॅक्ने येऊ शकतात. 

ब्यूटीशियनवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका

तेलकट त्वचा असल्यास ऑयली क्रिमने त्वेचेला मसाज करू नका. त्याचबरोबर जेथे फेशिअल करणार ते सलोन स्वच्छ असले पाहिजे. ब्यूटीशियन प्रोफेशन असायला हव्या. फेशिअलसाठी वापरले जाणारे प्रॉडक्टस योग्य असायला हवेत.

त्वचेवर खूप जास्त क्रिम लावू नका

तेलकट त्वचा असल्यास नाईट क्रिम लावणे टाळा. त्वचेवर अधिकाधिक क्रिम लावणे टाळा. त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या. त्याचबरोबर डोळ्यांभोवती क्रिम लावणे टाळा. रात्रभर डोळ्यांभोवती क्रिम तशीच ठेऊ देवू नका.

स्ट्रांग एस्ट्रीजेंट्सचा वापर करू नका

उन्हाळ्यात स्ट्रांग एस्ट्रीजेंट्स कामी येते. विशेषतः तेलकट त्वचेसाठी. कारण त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. एस्ट्रीजेंट्स स्ट्रांग असल्यास त्यात गुलाबपाणी मिसळा आणि एअरटाईट बॉटलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा.

सनस्क्रीन लावण्यास विसरू नका

वॉटरप्रूफ, ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरण्यास विसरू नका. तासाभराच्या अंतराने सनस्क्रीन लावत रहा.

चेहऱ्याला वारंवार हात लावू नका

आपल्या हातांवर किटाणू, बॅक्टेरीया असतात. म्हणून जर तुम्ही चेहऱ्याला वारंवार हात लावल्यास ते त्वचेवर पसरतात आणि त्वचेच्या समस्या वाढवतात.