सुकामेव्याचे फायदे नाही तर तोटेही लक्षात घेणे गरजेचे...

 सुकामेवा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आपण जाणतो. पण त्यामुळे होणारे नुकसानही आपण लक्षात घेतले पाहिजे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 14, 2018, 10:47 PM IST
सुकामेव्याचे फायदे नाही तर तोटेही लक्षात घेणे गरजेचे... title=

मुंबई : सुकामेवा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आपण जाणतो. पण त्यामुळे होणारे नुकसानही आपण लक्षात घेतले पाहिजे. जाणून घेऊया सुकामेव्यामुळे होणारे आरोग्यास होणारे तोटे...

पचनतंत्र बिघडतं

सुकामेव्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर आपल्या शरीराला आवश्यक असतात. मात्र त्याचे प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने पचनतंत्र बिघडतं. सुकामेवा काहीसा गरम असल्याने पाण्यात भिजवून खाणे फायद्याचे ठरेल. दिवसाला ५ बदाम खाणे ठीक आहे. याचे प्रमाण वाढवायचे असल्यास ते हळूहळू वाढवा.

वजन जलद गतीने वाढते

सुकामेव्याच्या सेवनाने वजन वाढते. MayoClinic.com च्या संशोधनानुसार, ३५०० कॅलरी घेतल्याने १ पाऊंड वजन वाढते. आहारात सुकामेवा घेतल्याने २५० कॅलरीज अधिक घेतल्या जातात. यानुसार एका महिन्यात २ पाऊंड वजन वाढेल.

दातांचे आरोग्य धोक्यात

सुकामेव्यात साखरेचे प्रमाण फ्रुक्टोज स्वरुपात असते. बाजारा मिळणारा सुकामेवा ड्रायफ्रुट मॉईर्श्चरपासून बचावासाठी त्यावर शुगर कोटींग केलेले असते. दातांच्या आरोग्यासाठी ते नुकसानकारक आहे. 

शुगर क्रश

सुकामेव्यात Glycemic Index चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ब्लड ग्लुकोजचे  प्रमाण वाढते. ब्लड ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढल्याने शुगर क्रश होऊ शकते. शुगर क्रशमुळे थकवा येतो.