नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते

कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 3, 2017, 09:04 AM IST
नातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते

मुंबई : कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...

हेटाळणी होणारे कुत्रेच येतात कामाला

आपल्याकडे अनेकांना कुत्रे पाळण्याची सवय असते. हे कुत्रे आजारी पडतात. त्यांना कधी कधी जखमा होता. त्यातून रक्त जाते. अति रक्तस्राव झाल्याने कुत्र्यांना रक्ताची गरज भासते. सहाजीकच माणसाला जसे माणसाचे रक्त हवे असते तसे कुत्र्यालाही कुत्र्याचेच रक्त हवे असणार. ही गरज भागवतात नेहमीच अनेकांच्या हेटाळणीचा विषय ठरलेले कुत्रेच. हे कुत्रे कुठेही भेटत असतात. जसे की, रस्त्ये, गल्ली, सार्वजनिक ठिकाणे आदी. ही कुत्रे नाते जपतात. इतर कुत्र्यांची रक्ताची नाती जपतात. रक्तदाता बनतात. इतर कुत्र्यांना जीवदान देतात.

95 कुत्र्यांनी केले रक्तदान

कदाचीत वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, गेल्या 4 वर्षात तब्बल 95 कुत्री रत्तदाता बनली आहेत. या 96 जणांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. परेल इथल्या जनावरांच्या दवाखाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक प्रकारची शस्त्रक्रिया, उपचार आदी गोष्टींमुळे कुत्र्यांच्या शरीरात रक्ताची कमी येते. अशा वेळी दुसऱ्या कुत्र्याकडून रक्त घेतले जाते. अशा वेळी रूग्णालयाकडे उपलब्ध असलेले कुत्रे ही गरज भागवतात. 2014 मध्ये 24, 2015 मध्ये 23, 2016 मध्ये 25 तर, 2017 मध्ये आतापर्यंत 23 कुत्र्यांना रक्तादानामुळे जीवदान मिळाले आहे. विशेष असे की, कुत्र्यांसाठी केले जाणारे रक्तदान केवळ परेल येथील बाई साखराबाई दिनशॉ पेटिट हॉस्पीटलमध्येच केले जाते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close